मारोती तुराणकर यांची भाजप कामगार आघाडीच्या मारेगाव तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती
मारेगाव : सचिन मेश्राम
भारतीय जनता पक्षाच्या मारेगाव तालुका शाखेच्या वतीने मारोती तुळशीराम तुराणकर यांची भाजप कामगार आघाडीच्या मारेगाव तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्राद्वारे त्यांच्यावर पक्ष संघटना मजबूत करण्यासोबतच कामगार आघाडीच्या माध्यमातून कामगारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मारोती तुळशीराम तुराणकर यांचा पक्ष संघटनेतील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नव्या जबाबदारीच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांच्यासाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या नियुक्ती सोहळ्यास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकराव उईके साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. प्रफुलजी चव्हाण, माजी आमदार मा. संजीव रेड्डी बोदकूरवार, वणी नगराध्यक्षा सौ. विद्याताई आत्राम, ज्येष्ठ नेते दिनकरजी पावडे, तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, तालुका महामंत्री प्रशांत नांदे तसेच शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नियुक्तीबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार व शुभेच्छुकांकडून मारोती तुळशीराम तुराणकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पक्षाने सोपविलेली नवी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत कामगारांच्या प्रश्नांसाठी आणि भाजप संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
0 Comments