रुग्णवाहिकेचे ‘देवदूत’ निलेशभाऊ बेंडे यांचा आज वाढदिवस; साईमित्र परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव
मारेगाव / पंकज नेहारे
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रुग्णालयापर्यंत पोहोचवून अनेकांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजावणारे साईमित्र परिवार, मारेगावचे स्थायी सदस्य तथा रुग्णवाहिकेचे देवदूत श्री. निलेशभाऊ बेंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे.
रुग्णवाहिका सेवा ही केवळ एक सेवा नसून संकटकाळात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी जीवनदायी आधार असते. या सेवेत निलेशभाऊ बेंडे यांनी सातत्याने संवेदनशीलता, तत्परता आणि माणुसकी जपत आपले योगदान दिले आहे. गरजू रुग्णांना मदतीचा हात देत त्यांनी सामाजिक बांधिलकीची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत साईमित्र परिवार, मारेगाव परिवारातील सदस्यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. निलेशभाऊ यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भविष्यातही समाजसेवेची अखंड प्रेरणा लाभो, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
“माणुसकीची सेवा हीच खरी समाजसेवा” या भावनेतून त्यांचे कार्य असेच अविरत सुरू राहो, हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा!
0 Comments