मारेगाव-वणी राज्यमार्गावर भीषण अपघात
उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; चालकाचा हात दंडापासून वेगळा
मारेगाव / सचिन मेश्राम : मारेगाव-वणी राज्यमार्गावरील खाडे फार्महाऊसजवळ, गौराळा फाट्याच्या परिसरात आज सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याचा डावा हात दंडापासून वेगळा झाल्याची धक्कादायक घटना घडली.
नेमके काय घडले?
शुभम रवींद्र ठावरी (वय २५ रा. आष्टी ,वरोरा) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. शुभम हा मारेगाव येथे फायनान्सचे काम आटोपून दुचाकीने वरोऱ्याच्या दिशेने परत जात होता. दरम्यान, खाडे फार्महाऊसजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्याच्या दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की शुभमचा डावा हात दंडापासून अलग झाला.
प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूरला हलविले
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी शुभमला तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला तातडीने चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किसन संकुलवार पुढील तपास करीत आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू
0 Comments