भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीने मुख्याध्यापक 'बेभान'! घोटाळा झाकण्यासाठी लादल्या अजब अटीलाखों-करोडोंचा निधी लाटणाऱ्या भ्रष्ट मुख्याध्यापकाला निलंबित करा इ

भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीने मुख्याध्यापक 'बेभान'! घोटाळा झाकण्यासाठी लादल्या अजब अटी

लाखों-करोडोंचा निधी लाटणाऱ्या भ्रष्ट मुख्याध्यापकाला निलंबित करून वसुली करण्याची सचिन मेश्राम यांची उघडल्‍या छातीने मागणी!



मारेगाव (पंकज नेहारे): शाळा प्रशासनातील लाखो-करोडो रुपयांचा निधी आणि सरकारी अनुदानाचा झालेला महाघोटाळा चव्हाट्यावर येण्याच्या तीव्र भीतीने पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मारेगावचे मुख्याध्यापक मुकुंदा परचाके यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील आर्थिक लुटमारीवर पांघरूण घालण्यासाठी आणि माहिती अधिकाराचा गळा घोटण्यासाठी या मुख्याध्यापकाने अर्जदाराकडे घरपट्टीची पावती आणि शौचालय वापरत असल्याचे प्रमाणपत्र मागण्याचा तुघलकी व बेकायदेशीर प्रकार केला आहे.

मुळ अर्जाला ४ महिने टोलवाटोलवी; अपिलातील आदेशाला दाखवली केराची टोपली! सामाजिक कार्यकर्ते सचिन पांडुरंग मेश्राम यांनी शाळा प्रशासनातील गैरव्यवहाराची कुंडली बाहेर काढण्यासाठी दिनांक ०६ एप्रिल २०२६ रोजी मूळ RTI अर्ज दाखल केला होता. मात्र, माहिती दिल्यास भ्रष्टाचार उघड होईल या भीतीने मुख्याध्यापक माहिती टाळत राहिल्याने अखेर प्रथम अपील दाखल करण्यात आले.

पंचायत समिती मारेगाव येथे प्रथम अपिलीय अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी (BEO) काटकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत मुख्याध्यापकाने आपली चूक उघडपणे कबूल केली. त्यावर अपिलीय अधिकाऱ्यांनी ७ दिवसांच्या आत विनामूल्य माहिती देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला थेट केराची टोपली दाखवत दि. ०७/०८/२०२६ चे अजब अटींचे पत्र पोस्टाद्वारे ११ ऑगस्ट २०२६ रोजी अर्जदाराला पाठवून दबावाखाली आणण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा केविलवाणा प्रयत्न मुख्याध्यापकाने केला आहे.

माहिती अधिकाराचा गळा घोटून अर्जदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न माहिती अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम ६(२) नुसार अर्जदाराला ओळखीचा कोणताही वैयक्तिक पुरावा किंवा माहिती मागण्याचे कारण देणे बंधनकारक नाही. फोटो ओळखपत्र जोडलेले असतानाही अशा बेकायदेशीर अटी लादणे म्हणजे माहिती अधिकार कायद्याची सर्रास पायमल्ली आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचा थेट अवमान आहे. "माहिती दिली तर शाळेतील लाखो-करोडोंचा निधी कसा लाटला, हा महाघोटाळा उघड होईल, याच भीतीपोटी मुख्याध्यापक ११ ऑगस्ट रोजी पोस्टाने प्राप्त झालेल्या पत्राद्वारे अटी लादण्याचा बनाव करून अर्जदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत," असा तुफान घणाघात सचिन मेश्राम यांनी केला आहे.

निलंबन करा आणि भ्रष्टाचाराची संपूर्ण रक्कम वसूल करा! या बेकायदेशीर आणि मुजोर कारभाराविरोधात सचिन मेश्राम यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे:

  • तात्काळ निलंबन व वसुली: शाळेच्या लाखो-करोडोंच्या हडप केलेल्या निधीचा हिशेब लावून दोषी मुख्याध्यापक मुकुंदा परचाके याला सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि भ्रष्टाचाराची सर्व रक्कम त्याच्याकडूनच वसूल करण्यात यावी.
  • राज्य माहिती आयोगात दंडात्मक कारवाई: प्रथम अपिलाचा आदेश धुडकावून लावणाऱ्या व अर्जदारावर दबाव आणणाऱ्या या मुख्याध्यापकाविरोधात माननीय राज्य माहिती आयोग (अमरावती खंडपीठ) कडे तक्रार दाखल करून RTI मधील कलम २०(१) व २०(२) अंतर्गत कडक दंडात्मक व प्रशासकीय कारवाईची मागणी करण्यात येईल.

६ एप्रिलपासून माहिती दडपणाऱ्या आणि अपीलाचे आदेश पायदळी तुडवणाऱ्या या भ्रष्ट मुख्याध्यापकाविरोधात सचिन मेश्राम यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मारेगाव शिक्षण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे!

Post a Comment

0 Comments