रविंद्र सुधाकर टोंगे यांची भाजप मारेगाव शहर सरचिटणीसपदी नियुक्ती
मारेगाव : सचिन मेश्राम
भारतीय जनता पक्षाच्या मारेगाव तालुका शाखेच्या वतीने रविंद्र सुधाकर टोंगे यांची भाजप मारेगाव शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप तालुका अध्यक्ष अविनाश देविदासजी लांबट यांनी दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी नियुक्तीपत्र देत रविंद्र टोंगे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली.
पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, शहरातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी रविंद्र टोंगे यांच्याकडून प्रभावी कामाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. नियुक्तीपत्रात त्यांच्या कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या नियुक्ती सोहळ्यास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकराव उईके साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. प्रफुलजी चव्हाण, माजी आमदार मा. संजीव रेड्डी बोदकूरवार, वणी नगराध्यक्षा सौ. विद्याताई आत्राम, ज्येष्ठ नेते दिनकरजी पावडे, तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, तालुका महामंत्री प्रशांत नांदे आणि शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
नवीन जबाबदारी मिळाल्याबद्दल रविंद्र सुधाकर टेंगे यांचे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार व शुभेच्छुकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत मारेगाव शहरात भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला
0 Comments