पिसगाव येथे बेपत्ता असलेल्या ४२ वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या
मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथील रहिवासी शंकर आत्राम (वय ४२ वर्ष) यांनी पाहपळ रस्त्यालगत असलेल्या नाल्याजवळ गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर किसन आत्राम हे दिनांक १५ ऑगस्ट रोजी पहाटे ४:०० वाजेपासून घरातून बेपत्ता झाले होते. नातेवाईक व कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता, आज दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास पाहपळ नाल्यालगत ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत शंकर आत्राम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments