राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाच्या महागाव तालुकाध्यक्षपदी कृष्णा पोटे
महागाव / प्रतिनिधी : राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाच्या महागाव तालुकाध्यक्षपदी कृष्णा हरिदास पोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा RACS महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी गजानन बाबाराव गंडाळे यांच्या स्वाक्षरीने १४ ऑगस्ट २०२६ रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले.
राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ हे आदिवासी विद्यार्थ्यांचे देशव्यापी संघटन असून, आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक व शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करण्याचा संघटनेचा उद्देश आहे.
नियुक्तीपत्रानुसार कृष्णा पोटे यांच्यावर महागाव तालुक्यात संघटनेची मजबूत बांधणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तालुक्यात विविध युनिट स्थापन करणे, नवीन कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करणे तसेच संघटनेच्या विविध उपक्रमांना गती देणे आदी जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत.
संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कार्य करण्याच्या सूचना नियुक्तीपत्रातून देण्यात आल्या आहेत. तसेच संघटनेच्या परवानगीशिवाय धार्मिक कार्यक्रम किंवा राजकीय पक्षाच्या मंचावर सहभागी न होण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
कृष्णा पोटे यांच्या नियुक्तीबद्दल आदिवासी समाजातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महागाव तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
0 Comments