मारेगावातील 'तो' खंडणीखोर मामा पुरता कोमात! खोट्या तक्रारींचा गोरखधंदा चव्हाट्यावर; वासनांधता अन् वसुलीची 'पापकुंभी' फुटली!
मारेगाव (सचिन मेश्राम):
नेहमी दुसऱ्यांना खोट्या गुन्ह्यांची भीती दाखवून नामोहरम करणाऱ्या मारेगावातील एका कुप्रसिद्ध, ब्लॅकमेलर आणि 'भाडखाऊ मामा'ची संपूर्ण यंत्रणा आणि मस्ती आता पार कोलमडली आहे. स्वतःचे चारित्र्य अत्यंत घाणेरडे, डागाळलेले आणि वासनांध असताना, समाजातील प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांना ब्लॅकमेल करण्याचा या मामाचा डाव आता त्याच्यावरच उलटला असून तो पुरता 'कोमात' गेला आहे.
स्थानिक मारेगाव पोलीस ठाण्यात डाळ शिजत नाही हे कळल्यावर, या मामाने शेजारच्या तालुक्यांतील पोलीस ठाण्यांचा आश्रय घेऊन खोट्या तक्रारी दाखल करण्याचा जो गोरखधंदा मांडला होता, तो आता पूर्णपणे उघडा पडला आहे.
'महिलेचा' हत्यार म्हणून वापर; ६ तालुक्यांत पसरले जाळे!
या भाडखाऊ मामाच्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरला आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मामाने मारेगाव, झरीजामणी, वणी, राळेगाव, पांढरकवडा, आणि कळंब या विविध तालुक्यांतील महिलांना समोर करून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी देण्याचा सपाटा लावला होता. या खोट्या तक्रारींवर नंतर स्वतःच मध्यस्थी करायची आणि 'भाडखाऊगिरी' करून शासकीय अधिकाऱ्यांकडून लाखो रुपयांची वसुली करायची, अशी याची संपूर्ण मोडस ऑपरेंडी (कार्यपद्धती) आता समोर आली आहे.
चर्चेला उधाण: अत्यंत लाजीरवाणी बाब म्हणजे, निष्पाप लोकांना धमकावून, लाचारी आणि दलाली करून गोळा केलेला हा वसुलीचा पैसा या मामाने स्वतःच्या वासनांधतेसाठी ‘बायकांवर’ उडवल्याची जोरदार चर्चा सध्या मारेगाव तालुक्यात रंगली आहे. स्वतःच्या पाठीमागे बदनामीचा आणि पापाचा प्रचंड अंधार असताना, हा मामा दुसऱ्यांचे आयुष्य अंधारात ढकलण्याचे नीच षड्यंत्र रचत होता.
पत्रकार, शिक्षकावर विनयभंग; रेल्वे 'TT' बनणाऱ्या तरुणाचे करिअर केले उद्ध्वस्त!
शंभर-शंभर रुपयांसाठी लाचारी करणाऱ्या या भाडखाऊ मामाने आजवर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. तिन प्रामाणिक पत्रकार आणि शिक्षकावर थेट विनयभंग व बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करण्याचा नीच पराक्रम याने केला.
इतकेच नव्हे तर, अत्यंत कष्टाने अभ्यास करून रेल्वेमध्ये 'टीटी' (TT) म्हणून हक्काची शासकीय नोकरी मिळवण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या एका होतकरू, गरीब तरुणाला बलात्काराच्या खोट्या केसमध्ये अडकवून त्याचे संपूर्ण करिअर मातीने मिळवले. मात्र, संविधानाच्या ताकदीपुढे या ब्लॅकमेलरचे सगळे मनसुबे आता धुळीस मिळाले असून समाजात तोंड दाखवायला जागा न उरल्याने या मामाची अवस्था सध्या 'जिता जागता मृतदेह' झाल्यासारखी झाली आहे.
परवानाधारकांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा 'प्लॅन' फसला; १० हजारांसाठी ८० लाखांची नोटीस!
हा ब्लॅकमेलर केवळ एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने राजकीय लोकप्रतिनिधी आणि प्रामाणिक समाजसेवकांनाही टार्गेट केले होते. अलीकडेच, एका दारू परवानाधारकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून पत्रकारांवर निशाणा साधण्याचा या मामाचा डाव पूर्णपणे फसला.
या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, या भाडखाऊ मामाने त्या दारू विक्रेत्याकडून अवघे १० हजार रुपये घेतले आणि वकिलांमार्फत थेट ८० लाख रुपयांचा दावा ठोकण्याची कायदेशीर नोटीस पाठवली. या दारू धंदेवाईकाच्या नादापायी आणि अशा फसव्या नोटिसांच्या खेळामुळे मामाची उरलीसुरली इभ्रतही वेशीवर टांगली गेली असून तो आता मान खाली घालून फिरत आहे.
"तुझ्यासारखे शेकडो मामा आले तरी माझी लेखणी थांबणार नाही!"
या संपूर्ण प्रकरणावर स्थानिक पत्रकार सचिन मेश्राम यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे:
"हद्द बदलून, पोलीस ठाणी बदलून निष्पाप तरुण, शिक्षक आणि पत्रकारांवर खोट्या तक्रारींचा बाजार मांडणाऱ्या या भाडखाऊ आणि ब्लॅकमेलर मामाची माझ्या लेखणीला रोखण्याची औकात नाही. माझ्या पाठीशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पवित्र आणि शक्तिशाली संविधान आहे. पैशांच्या, सत्तेच्या आणि खोट्या आरोपांच्या जोरावर धमकावणाऱ्या या प्रवृत्तीला गाडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सत्याचा विजय निश्चित आहे!"
मामाची उलटगणती सुरू; समाजात बहिष्कृत होण्याची वेळ!
स्वतःचा खिसा गरम करण्यासाठी आणि स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्यांच्या नोकऱ्या आणि आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या तथाकथित 'भाडखाऊ मामा'ची उलटी गिनती आता सुरू झाली आहे. पत्रकारांच्या लेखणीचा थेट दणका बसल्याने या तोतयाची पूर्ण हवा निघाली आहे. संविधानाच्या आणि सत्याच्या ताकदीला आव्हान देणाऱ्या, तसेच महिलांचा वापर करून वसुली करणाऱ्या अशा दलालांना मारेगाव तालुका आता रस्त्यावर आणून धडा शिकवणार, हे मात्र नक्की!
"वारे भाडखाऊ मामा... घे अजून पाप, जस भरलंय तसं भरावं तर लागणारच!"
0 Comments