त्या' पिसाळलेल्या मामाचा जळफळाट; दारू दुकानदाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून पत्रकाराला अडकवण्याचा केविलवाणा डाव!
सचिन मेश्राम - मारेगाव
आपल्याच भाच्याला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी तो 'भाडखाऊ मामा' आता पूर्णपणे पिसाळला आहे. मानसिक संतुलन हरपल्यासारखा तो गल्लीबोळात बदनामीचे डावपेच आखत सुटला आहे. पण त्याने एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेवावी—तुझ्यासारख्या कपटी मामाने कितीही डोकं आपटलं आणि आकाश-पाताळ एक केलं, तरी तुझा भाचा अत्यंत प्रामाणिक आहे. तो तुझ्या कुठल्याही फसवणुकीच्या आणि नीच राजकारणाच्या जाळ्यात कधीच अडकणार नाही!
स्वतःची काही लायकी उरली नाही आणि समोर येऊन नडण्याची हिंमत नाही, म्हणूनच शेवटी या डरपोक मामाने एका दारू दुकानदाराचे कान भरले. त्याला पुढे करून वकिलामार्फत खोटी नोटीस पाठवण्याचा भ्याड धंदा या मामाने सुरू केला आहे. नोटीस पाठवून पत्रकाराचा आवाज दाबता येईल अशा भ्रमात तो वावरत आहे.
पण अशा फालतू धमक्यांना आणि नोटिसींना आपण कस्पटासमान समजतो. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे संविधान दिले आहे, त्या संविधानाच्या चौकटीत राहून आणि कायद्याने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करूनच आपण निष्पक्ष व पुराव्यांवर आधारित बातम्या प्रकाशित करत आलो आहोत आणि करत राहू! बाबासाहेबांच्या संविधानाने पत्रकारांना आणि सामान्य जनतेला अन्यायाविरुद्ध लढण्याची जी ताकद दिली आहे, त्या ताकदीपुढे तुझ्यासारखे अनेक 'मामा' आणि त्यांच्या खोट्या नोटिसा क्षणात भुईसपाट होतील.
लक्षात ठेव भाडखाऊ मामा, हा देश आणि ही व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालते, तुझ्यासारख्या कपटी लोकांच्या इशाऱ्यावर नाही. तुझ्या खोट्या नोटिसीला संविधानाच्या आणि कायद्याच्या भाषेतच असं चोख उत्तर दिलं जाईल की, पुन्हा तोंड दाखवायला जागा उरणार नाही!
0 Comments