डॉ. निरज वाघमारे उत्कृष्ट लीडरशिप पुरस्काराने सन्मानित.( मराठी सिनेअभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते डॉ. वाघमारे यांचा गौरव.)

डॉ. निरज वाघमारे उत्कृष्ट लीडरशिप पुरस्काराने सन्मानित.
( मराठी सिनेअभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते डॉ. वाघमारे यांचा गौरव.)

यवतमाळ : प्रतिनिधी

  शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. निरज वाघमारे यांच्या सामाजिक कार्याची नागपूर येथील वूमन्स टीव्ही ग्रुप यांच्या कडून दखल घेत, त्यांना सण २०२१ चा लीडरशिप हा पुरस्कार जाहीर करण्यात आला या पुरस्काराचे वितरण आज मराठी सिने अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते नागपूर येथील हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉइंट येथे करण्यात आला.
           शहरासह जिल्हाभरात डॉ. निरज वाघमारे यांची सामाजिक कार्यात भरीव कामगिरी असून स्वखर्चाची असलेली आरोग्य यंत्रणेतील रुग्णवाहिका, पाणीपुरवठयासाठी पाणी टँकर, घनकचरा व्यवस्थापनासाठी असलेली घंटागाडी, गरजूंना अन्नधान्य वाटप, विद्यार्थ्यांना व खेळाडूंना मदत, रस्त्याकडेला असलेल्या धंदेवाईकांना मदत, कामगारांसाठी विविध उपक्रम, महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप, पावसाळ्यात रेनकोट वाटप, मास्क - सॅनिटायझर, फॉगिग, यासारख्या सामाजिक कार्यात आणि जनसामान्यांच्या विविध समस्येला घेऊन शासनदरबारी लढा देण्यासाठी विविध अभिनव आंदोलने यामुळे  डॉ.वाघमारे यांची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एक चांगली प्रतिमा आहे. त्यांच्या या कार्याचे नेहमीच विविध समाज, संस्था आणि संघटनाच्या वतीने गौरव करण्यात येते. त्यांच्या या कार्याचा आढावा  पाहता नुकतीच नेल्सन मंडेला अवार्ड पीस २०२१ तर्फे वाघमारे यांना "डॉक्टरेट" ही पदवी प्रदान करण्यात आली. 
          नागपूर येथील वुमेन्स टीव्ही ग्रुप तर्फे विविध क्षेत्रात कौतुकास्पद कार्य करणाऱ्या युवा आणि युवतींना दरवर्षी लीडरशिप अवॉर्ड देण्यात येतो या वर्षीचा सामाजिक क्षेत्रातील लीडरशिप अवॉर्ड २०२१ हा पुरस्कार डॉ. निरज वाघमारे यांना जाहीर करण्यात आला या पुरस्काराचे वितरण आज २३ सप्टेंबर रोजी नागपूर येथील हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉइंट येथे मराठी सिने अभिनेते श्री विजय पाटकर यांच्या हस्ते देऊन डॉ. वाघमारे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अँड. सुरेखा कुंभारे ( माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य) आमदार मोहन मत्ते, गिरीश पांडव आयोजक संदीप कांबळे डॉ. निशा तलवेकर, डॉ. राजु टाकसाळे,डॉ. मनिष पाटील, डॉ. प्रिती मानमोडे, डॉ. युवराज ठाकरे, डॉ. शीतल देशमुख, बिपाशा पाटील, राजेश लोंढे, स्नेहल दाते, वैशाली वाघमारे, प्रथमेश गायकवाड, सविता धोबेकर, अरुणीता पाटील, अरुण मिश्रा, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.