बद्रुद्दीन काझी मारेगाव तालुका संपर्क प्रमुखपदी व राजु मोरे तालुका संघटक पदी निवड

बद्रुद्दीन काझी मारेगाव तालुका संपर्क प्रमुखपदी व राजु मोरे तालुका संघटक पदी निवड 


सचिन मेश्राम - मारेगाव 
मारेगाव : माजी ग्रामपंचायत सदस्य बद्रुद्दीन काझी यांची शिवसेना मारेगाव तालुका संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
काझी  हे ज्येष्ठ आणि कट्टर शिवसैनिक  शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि वणी  विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांचे निष्ठावंत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
पक्षाशी असलेल्या निष्ठेची दखल घेत राज्याचे मा. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांची मारेगाव तालुका संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

मारेगाव तालुका: मारेगाव तालुका प्रमुख पदी
पुरुषोत्तम बुटे, तालुका संघटक - राजू मोरे, समन्वयक अतुल वटे, संपर्कप्रमुख सचिन पचारे, सचिव दिवाकर सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n मारेगाव शहर : शहरप्रमुख- अभय चौधरी, शहर संघटक- विजय खामणकर, समन्वयक- प्रवीण बोबडे, संपर्कप्रमुख - बदरुद्दीन काजी, सचिव- हरिभाऊ वरटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n मारेगाव तालुका महिला पदाधिकारी: तालुका संघटक- इंदुताई किन्हेकर, तालुका समन्वयक मनिषा टोंगे, तालुका संपर्कप्रमुख- वनिता काळे, तालुका सचिव- राधा गोवारदिपे. n मारेगाव शहर महिला पदाधिकारी: महिला शहरप्रमुख- वर्षा पिंगरे, शहर समन्वयक- माला बदकी, संपर्कप्रमुख- जिजाबाई वरारकर, महिला शहर सचिव- माधुरी नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 नियुक्तीबद्दल वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.