बहुजन मुक्ति पार्टी यवतमाळ चे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न.



बहुजन मुक्ति पार्टी यवतमाळ चे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न.

यवतमाळ--बहुजन मुक्ती पार्टी यवतमाळ जिल्हा स्तरीय कार्यकर्ता मेळावा गुरुवार दि.22/09/2021ला दुपारी 2 वा. जे.सी.भवन धामणगाव रोड, यवतमाळ येथे संपन्न झाला. 

बहुजन मुक्ति पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.श्रीकांतदादा होवाळ ह्यांनी कार्यकर्ता मेळावाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले की मुलनिवासी बहुजनांची एकमेव पार्टी म्हणजे बहुजन मुक्ती पार्टी ह्यामध्ये obc चा जंनगणनेचा मुद्दा असो,आदिवास्यांच्या 5 वी 6 वी अनुसूची चा मुद्दा असो, अनुसूचित जातींच्या समस्या असो, भटक्या विमुक्तांच्या किंवा मुस्लिम समाजातील लोकांच्या समसस्येबद्दल फक्त आणि फक्त बहुजन मुक्ती पार्टीच पुढाकार घेऊन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येऊन आंदोलने करीत आहे. काँग्रेस आणि बीजेपी मात्र गप्प बसून आहे .रस्त्यावरची लढाई फक्त बहुजन मुक्ती पार्टी लढत आहे .कारण ह्या दोन पार्ट्या नाही तर एकच आहे एक सापनाथ आहे तर एक नागनाथ आहे. विरोधी पक्ष फक्त एकच आहे आणि तो म्हणजे बहुजन मुक्ती पार्टी ही 85% लोकांना न्याय मिळविण्यासाठी सदैव तत्पर राहील असे आश्वासन मा.श्रीकांतदादा होवाळ ह्यांनी केले.
या कार्यकर्ता मेळावे चे उदघाटक  म्हणून मा. बाळकृष्ण गेडाम प्रदेश गोंगप्पा महा. प्रमुख,मार्गदर्शन म्हणून मा.प्रताप दादा पाटील ,कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा पश्चिम विदर्भ प्रभारी,बहुजन मुक्ती पार्टी , मा.ऍड.अनिल किनाके,उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य बहुजन मुक्ती पार्टी(पांढरकवडा), मा.सारिका भगत मॅडम महासचिव महाराष्ट्र राज्य बहुजन मुक्ती पार्टी (यवतमाळ),  मा.कुंदा तोडकर मॅडम प्रदेशाध्यक्षा राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघ यवतमाळ, मा. इंदुताई मोहर्लीकर मॅडम जिल्हाध्यक्षा बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी यवतमाळ.प्रमुख उपस्थिती मा. भिमराव कोरपते, तालुका अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी पांढरकवडा,मा.बिमोद मुधाने तालुका अध्यक्ष तथा विधानसभा प्रभारी (बहुजन मुक्ती पार्टी) नेर,दिग्रस, दारव्हा.मा. प्रतिभा गुजर (विधानसभा प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी ,यवतमाळ)मा. गजानन लेनगुरे  तालुका अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी घाटंजी,मा. संजय इंगोले तालुका अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी राळेगाव,मा. उज्वला पाटील शहर उपाध्यक्ष  बहुजन मुक्ती पार्टी यवतमाळ,  मा.बळवंत मडावी कार्याध्यक्ष गोंगप्पा पार्टी राज्य कार्यकारिणी महा.,मा. शंकरराव जाधव माजी सरपंच जांब,मा. सौ.शितल गेडाम वडगाव पो.स्टे., मेळावेच्या सूत्रसंचालन प्रशांत मुनेश्वर यांनी व आभार प्रदर्शन प्रतिभा गुजर ह्यांनी केले.