दुचाकीच्या भिषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
कळंब रोडवरील उमरी फाटया जवळ भिषण अपघात
कळंब (तालुका प्रतिनिधी) राळेगाव रोडवरील उमरी फाटया जवळ झालेल्या भिषण अपघात दुचाकीस्वार जागिच ठार झाल्याची घटना दि 22/09/21 रोज बुधवारला रात्री 8.00 च्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे की राळेगाव यवतमाळ रोडवरील उमरी फाटया जवळ राज्य परिवहन राळेगांव आगाराच्या बसची चेकींग चालू असताना चेकींग अधिकारी यांनी आपले वाहन क्रमांक MH 06 AW TATA SUMO हे अगदी रोडवर उभे ठेवले असता त्या वाहनाला कुठल्याही प्रकारचे इंडिकेटर चालु नव्हते अशातच भरधाव येनार दुचाकी स्वार त्या वाहनावर जावुन आदळली दुचाकीचा वेग ईतका जास्त होता की त्याच त्याचा जागीच मृत्यू झाला दुचाकीस्वार सागर दिपकसिंह सुरसवाल रा. राळेगाव असे असुन अपघात दुचाकी पुर्णपणे चुरा झाली असून दुचाकी वाहन क्रमांक MH 29 U 2434 असा आहे घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस स्टेशन ठाणेदार अजित राठोड यांनी आपल्या ताफ्याला घटनास्थळी रवाना केले व वाहनासह प्रेत ताब्यात घेऊन बाँडीला कळंब ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करिता पाठविण्यात आले होते. घटनेचा पुढील API किशोर मावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करित आहे.
फोटो