दिग्रस येथील गणेश भक्तावरील गुन्हे मागे घ्या

दिग्रस येथील गणेश भक्तावरील गुन्हे मागे घ्या 

राजकीय' पक्षाचे पदाधिकारी,शांतता कमेटी सदस्य व गणेश भक्तांनी दिले निवेदन

प्रतिनिधी | दिग्रस


दिग्रस येथील गणेश भक्‍तांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी दिग्रस येथील राजकीय पक्षाचे पदाधिकारी ,शांतता कमेटी सदस्य व भक्त गणांनी दिग्रस पोलीस स्टेशन येथे उपनिरीक्षक विशाल बोरकर व तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज गुरुवार, दि.२३ सप्टेंबर २०२१ रोजी निवेदन सादर केले.

      दिग्रस येथील गणेशं मंडळांनी दि. १९ सप्टेबंर २०२१ रोजी गणेश स्थापना
मंडप ते होल्टेकपुरा येथील विसर्जन स्थळापर्यंत ट्रॅकटरमध्ये गणेश मुर्ती घेवुन गणेश मुर्तीचे विसर्जन केलें. मिरवणुक सदृश्य परिस्थीती निर्माण होवु नये या करीता दोन ट्रॅक्टर मधील अंतर २०० मीटर होते. तसेच विसर्जन शांततेत पार पडले परंतु दिग्रस येथील ६ गणेश मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अशाच' प्रकारे गुन्हे पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या बैलगाडया शर्यती दरम्यान गुन्हे
दाखल झाले असता त्यांच्यावंरील' गुन्हे मागे घेण्यात आले. त्याच धर्तीवर दिग्रस
येथील गणेश भक्तावरील गुन्हे परत घ्यावे घ्यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.

     निवेदन देतेवेळी रवींद्र अरगडे,अजिंक्य मात्रे, विनायक दुधे, राहुल देशपांडे, सुधीर भोसले, नूर मोहंमद खान, रमाकांत काळे, संजीव चोपडे, ऍड.विवेक बनगीनवार, शिल्पा खंडारे, अरविंद मिश्रा,ओम वऱ्हाडे,विजय सरदार,श्याम पाटील,गणेश काललकर, असिफ बंगाली, गणेश चव्हाण,संदीप झोडगे,गणेश भातुकले,संजय घरत,प्रज्योत अरगडे,प्रशांत गौरकर,किशोर साबू आदी उपस्थित होते.