काशिनाथ ब्राह्मणे यांच्या स्मृतिदिनी वृध्दाश्रमात भोजनदान

काशिनाथ ब्राह्मणे यांच्या स्मृतिदिनी वृध्दाश्रमात भोजनदान


संत डोला महाराज वृध्दाश्रम, उमरीपठार येथे दि २१ सप्टेंबर रोजी काशिनाथ ब्राह्मणे यांच्या प्रथम स्मृतिदिनी वृध्दाश्रमातील वृध्दांना ब्राह्मणे कुटुंब यांनी भोजनदान करून स्मृती दिन साजरा केला.  सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते काशिनाथ ब्राह्मणे यांच्या फोटोला माल्यार्पण करून सर्वांनी अभिवादन केले. यावेळी प्रविण भोयर यांनी ब्राह्मणे यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती मनोगतातून व्यक्त केली. त्यानंतर काशिनाथ ब्राह्मणे यांना मौन आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे शेवटी भोजनदान करण्यात आले. 
कार्यक्रमाचे संचालन महेश देशकर यांनी केले तर आभार भूषण ब्राह्मणे यांनी मानले. 
यावेळी वृध्दाश्रमाचे संचालक शेषराव डोंगरे, आशाताई ब्राम्हणे, मॉर्निंग वाॅक ग्रुप दर्डा नगर यवतमाळ चे प्रविण भोयर, हरिदास दुबे, अशोक कारमोरे, महेश देशकर यांचेसह रवीन्द्र खराबे,  खुशाल ब्राम्हणे, संदीप देवपारे, शशिकांत फेंडर, माधुरी फेंडर, भूषण ब्राम्हणे, निकिता देवपारे, लीना बोंद्रे, अंश देवपारे,आरव देवपारे ईत्यादी उपस्थित होते.