दारव्हा येथे रक्तदान शिबिर संपन्न

दारव्हा येथे रक्तदान शिबिर संपन्न




स्थानिक दारव्हा शहरातील जिजाऊ बीग्रेड माळी महिला संघटना विहार महिला संघटना मराठा महिला संघटना जैन मारवाडी तेरापंथी महिला संघटना बंजारा महिला संघटना आदी महिला संघटनांच्या वतीने गजानन महाराज सांस्कृतिक भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
          या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार सुभाष जाधव हे होते तर उद्घाटक ठाणेदार सुरेश मस्के होते तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार सुनील सरागे आणि एकशे एक वेळा रक्तदान करून दारव्हा शहरात विक्रम करणारे किशोर घेरवरा  हे उपस्थित होते.
      या कार्यक्रमाची सुरुवात महिला मुक्तीसाठी ज्यांनी ती अहोरात्र मेहनत केली अशा महामानवांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून व दिपप्रज्वलन करून आणि सौ वंदना जाधव यांनी जिजाऊ वंदना द्वारे केली.
          याप्रसंगी कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावली त्यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला तेव्हा डॉ. कदम डॉ.मांगे डॉ.  गजानन खारोडे, प्रवीण दुधे अनिल गोकुळे ,संतोष कराळे, प्रवीण नगराडे ,सागर चक्रे, पुरुषोत्तम शेळके, उमेश गुघाणे , गजानन चौधरी, वासुदेव पवणे, गुणवंत भेंडे, राजेश चव्हाण आदींसह डॉ. कोमल सांगानी, डॉ. ऋचा पोटफोडे ,डॉ. अश्विनी भेंडे, डॉ.कांचन नरवडे, डॉ. राठोड यांचा सन्मान करण्यात आला
      या कार्यक्रमाचे संचालन माधुरी लोखंडे , अर्चना उडाके यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. अवंती राऊत यांनी केले तर आभार पल्लवी गोहाड यांनी मानले.
      या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ.कांचन नरवडे, प्रा. अवंती राऊत , अर्चना उडाखे, अडवोकेट वैशाली हिरे ,वंदना जाधव, सुनिता शेंदुरकर, कल्पना लोखंडे, अलका कदम ,संध्या साबू, रजनी ढाकुलकर ,संजीवनी निमकर शीला नाईकवाडे ,खारोडे मॅडम, नीता राठी ,दिपाली राठोड पुष्पा ताई मनवर, कुसुम ताई खिवसरा, कल्पना बागेरचा ,पुष्पा  ,योगिता राठोड, रेश्मा डोईफोडे कोकिळाबाई राऊत गजभिये काकू शुभांगी गडपायले नानुबाई खाडे सीमा चव्हाण स्वाती देवघरे पुष्पलता चिंतकुंटणवार संगीता राजगुरे धम्मा भिमटे दिपाली कोठारी सारिका बागेरचा सीमा बागेरचा आदींनी परिश्रम घेतले