तालुक्यातील आदर्श गाव पाथ्रङ गोळे येथे विवीध उपक्रम राबविले जातात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सञ संपुर्ण राज्यामध्ये सुरु आहे याचाच एक भाग म्हणुन व शासनाच्या योजनेची अंमलबजावणी म्हणून व समाजाप्रती आपले काहि देणे म्हणून गावातील अंध अपंग निराधार माणसिक रुग्ण दुर्धर आजाराने पिङित ईतर उपेक्षित घटकातील अशा लोकांचे लसीकरण पाथ्रङ येथिल आरोग्य टिमने केले आहे याचे ऊदाहरण म्हणजे गावातील अपंग व निराधार महिला सुनंदा राजु बोरकर वय ५० हि महिला दोनहि पायाने अपंग आहे व माणसिक रुग्ण व निराधार आहे ती दिवसभर गावाच्या बाहेर रोङवर बसलेली असते. तीला कशाचेहि भान नसते ती माणसिक रुग्ण आहे पाथ्रङ येथे कोविङ लसीकरण कँम्प आयोजीत होता यातच समयसुचकता दाखवत गावचे पोलीस पाटिल प्रफुल नेरकर यांनी त्या महिलेचे लसीकरण करायाचे आहे असे आरोग्य टिमला सांगीतले व आरोग्य टिमने सुध्दा लगेच प्रतीसाद देत ति महिला जिथे बसते तिथे जाऊन तिचे लसिकरण केले विशेष म्हणजे सोनोने मँङम नर्स यांनी सुनंदा बोरकर हिला अगोदर नास्ता चहा देऊन व ती जिथे बसते तिथे जाऊन लस दिली यावेळी पोलीस पाटिल प्रफुल नेरकर ङाँ. प्रिया गारमेलवार मँङम CHO वटफळी जे. के. सगळे HA माणिकवाङा जि. एस मेहरे आरोग्य सेवक पाथ्रङ एस .ए. सोनोने ANM पाथ्रङ मनोरमा मावशी ङोगरे सौरव सारवे आशिष गावंङे देवानंद गायनर लता गजभिये आशा वर्कर अनंत पङघन कोतवाल श्रीधर घोङे शिपाई हजर होते ..