यवतमाळ ऑटो रिक्षा चालक मालक संघटना वतीनेश्रद्धेय बबनरावजी पडगिलवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थऑटोचालकांची डोळे तपासणी व चष्मे वाटप

यवतमाळ ऑटो रिक्षा चालक मालक संघटना वतीने
श्रद्धेय बबनरावजी पडगिलवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ
ऑटोचालकांची डोळे तपासणी व चष्मे वाटप


यवतमाळ-:-प्रतिनिधी

दत्त नेत्रालय डॉ. पियुष पाटील व ऑटो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने 12 सप्टेंबर रोजी डोळे तपासणी करण्यात आली होती. यामध्ये सर्व ऑटो चालकांना जवळचा नंबर दूरचा नंबर व तसेच 12 ऑटो चालकांना मोतीबिंदू असल्याचे निदर्शनास आले. अनेक वेळा आटो चालवत असताना व्यवसायाच्या कामात ऑटो चालक स्वतःचे डोळे तपासणी विसरून जात होते. त्यामुळे ऑटो संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पडगिलवार व डॉ.पियुष पाटील यांच्या पुढाकाराने ऑटो चालकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे डोळे तपासणी करण्यात आली. यामध्ये 310 चालकांनी सहभाग घेतला होता. आणि आज  22 सप्टेंबर रोजी सर्व ऑटोचालकांना श्रद्धेय बबनरावजी पडगिलवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऑटो चालकांना चष्मे वाटप करण्यात आले. अतिशय उत्तम क्वालिटीची फ्रेम व ग्लास यामध्ये टाकून देण्यात आली. यासाठी यश ऑप्टिकल राजु पारसेवार यांच्या विशेष सहकार्याने लाभले . संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पडगिलवार यांनी हा सेवा उपक्रम राबविला या कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष युनूस खान, पप्पू शुक्ला ,विठ्ठल शिरसागर, अशोक लुटे ,शंकर लोहवे, संदीप बेलखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.