उमरखेड नगर परिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी मनसेच्या वतीने डफडे वाजवा आंदोलन
शहरात अवैध खोदकाम करणाऱ्या जिओ कंपनीवर कारवाई होणार कधी
उमरखेड शहरात जिओ कंपनीचे अवैध खोदकाम सुरू असुन त्याविरोधात तक्रार करून सुद्धा नगर परिषद प्रशासन कारवाई करीत नसल्याने झोपेचे सोंग घेतलेल्या नगर परिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी मनसेच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर डफडे वाजवुन निषेध आंदोलन करण्यात आले.
उमरखेड शहरामध्ये जिओ कंपनीने केबल टाकण्यासाठी खोदकाम केले जात असुन शहरातील अनेक रस्त्यांची वाट लावुन शासनाची नुकसान केल्या जात आहे.या खोदकामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याने या अवैध खोदकामावर कारवाई करून झालेली नुकसान भरपाई वसुल करण्यात यावी.
यासाठी मनसेच्यावतीने निवेदन देण्यात आले.परंतु नगर परिषद प्रशासनातील काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांमार्फत सदर कंपनीशी आर्थिक संधान साधुन कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केल्या जात असल्याचे दिसुन येत आहे.
शहरातील सर्व सामान्य नागरिकांना साधे नळाचे कनेक्शन घेवुन खोदकाम करण्यासाठी विविध परवानग्यांची आडकाठी आणणारे नगर परिषद प्रशासन मात्र शहरात होत असलेल्या विना परवानगी खोदकामावर तक्रारी करून सुद्धा कारवाई केल्या जात. नसल्याने.
झोपेचे सोंग घेणाऱ्या नगर परिषद प्रशासनाला जागे करून अवैध खोदकाम करणाऱ्या जिओ कंपनीवर कारवाई करण्यात यावी.यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज नगर परिषद कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष डेव्हिड शहाणे,मनसे तालुकाध्यक्ष सादिक शेख,शहराध्यक्ष संजय बिजोरे, प्रविण भिमटे, विक्की पडघणे,मारोती देशमुख,अमोल लांबटीळे,विशाल कदम,माधव नरवाडे,
विजय सोनटक्के,मुकुंद जोशी,अमोल मोरे,अनुराग जोगदंडे,सुरज कऱ्हाळे,विनायक फाटे,महेश काळबांडे,प्रज्वल बडेकर,ब्रम्हानंद पुरमे यांच्यासह मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
*फोटो*