महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त निघालेल्या रथाचे क्रांतीज्योती ब्रिगेड वरुड संघटनेच्या वतीने भव्य स्वागत
अर्पित वाहाणे | वरुड
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त समता परिषदेच्या वतीने राज्यभर काढण्यात आलेला जनजागृती चित्ररथ मंगळवारी दि. १९ मे २०२६ रोजी सायंकाळी वरुड शहरात दाखल झाला. यावेळी महात्मा फुले चौक येथे क्रांतीज्योती ब्रिगेड वरुड संघटनेच्या वतीने रथाचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.
रथ शहरात पोहोचताच कार्यकर्त्यांनी फुले उधळत, हार अर्पण करत आणि महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या रथयात्रेचे स्वागत करताना कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
यावेळी क्रांतीज्योती ब्रिगेडचे जिल्हा संघटक व कार्याध्यक्ष विनय चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष महिला डॉ. मीनाताई बंदे, तालुका अध्यक्ष महिला नीता ताई चिमोटे, शहराध्यक्ष महिला डॉ. जया अळसपुरे, महिला मार्गदर्शक जया नेरकर, ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. निळकंठ यावलकर, दिलीप भोयर, अशोक देवते, प्रभाकर काळे, तालुकाध्यक्ष किशोर तडस, शहराध्यक्ष सुकांत यावले, शहर सचिव बाबाराव फरकाडे, उपाध्यक्ष भागवत आंडे, कोषाध्यक्ष राजूभाऊ घुमटकर, तालुका सचिव दिनेश खेरडे, उपाध्यक्ष विनोद भेलकर, डॉ. सुधाकर बंदे, सुभाष मालपे, नितीन खेरडे, नितीन ठाकरे, पुरुषोत्तम कळमकर, प्रदीप देवते, गणेश लेकुरवाळे, उज्वल डाहाके, संजय पवार, सुभाष राऊत, शोभा राऊत, नितीन गनगणे, अमोल खाजबागे, दीपेश टाकरखेडे, सतीश फरकाडे यांच्यासह वरुड शहर व तालुक्यातील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्वागत सोहळ्यातून महात्मा फुले यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना उजाळा देण्यात आला. घोषणांनी आणि जल्लोषाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.
0 Comments