*अकोला बाजारच्या मातीतून उठलेला समतेचा एल्गार! सम्यक घुले यांच्या सामाजिक चळवळीची राष्ट्रीय पातळीवर दखल; 'राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार' जाहीर
वर्धा अर्पित वाहाणे
मो-8956647004
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजात पेरणाऱ्या युवा कार्यकर्त्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान
प्रस्थापित विषमतेच्या भिंतींना धक्के देण्यासाठी, तळागाळातील माणसाला जागृत करण्यासाठी आणि प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणारा अकोला बाजारचा बुलंद आवाज म्हणजेच सामाजिक कार्यकर्ते सम्यक रवींद्र घुले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार जनमानसात आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पेरण्याचे प्रामाणिक काम करणाऱ्या या तरुण कार्यकर्त्याच्या चळवळीची दखल अखेर राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. सम्यक घुले यांना या वर्षाचा अत्यंत मानाचा 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६' जाहीर झाला आहे.
हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर अकोला बाजारच्या मातीत बाबासाहेबांचे विचार रुजवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि चळवळीचा हा फार मोठा विजय आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती वर्षाचे ऐतिहासिक औचित्य साधून, ज्ञानदिप सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
सम्यक घुले यांनी कोणत्याही स्वार्थाशिवाय, समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांमध्ये स्वाभिमान जागा करण्यासाठी नेहमीच बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्याचे व्रत अंगीकारले आहे. समाजात सकारात्मक विचारांची पेरणी, जनमानसात जागृती आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची एक स्वाभिमानी आणि लढवय्या कार्यकर्त्याची ओळख निर्माण केली आहे. समतेची आणि बंधुत्वाची भावना समाजात रुजवण्याच्या त्यांच्या याच अविरत कार्याला आज सन्मानित करण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठवले आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीने अधिकृत पत्र पाठवून सम्यक यांच्या नावाची घोषणा केली तेव्हा अकोला बाजारच्या तरुणाईमध्ये आणि चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष सुरू झाला. हा पुरस्कार सोहळा २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता, नाशिक येथील समुद्र लॉन्स येथे पार पडणार आहे.
मा. आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते सम्यक घुले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यावेळी महाराष्ट्रातील अनेक विचारवंत, सामाजिक चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहून सम्यक घुले यांच्या या कार्याचा गौरव करणार आहेत.
अकोला बाजारच्या एका तरुण कार्यकर्त्याने आपल्या कामाच्या जोरावर राष्ट्रीय पातळीला दखल घ्यायला लावली, या भावनेने सध्या परिसरात आनंदाचे उधाण आले आहे
0 Comments