मारेगाव येथे माजी खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
मारेगाव: सचिन मेश्राम
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या कार्याची आठवण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. स्व. बाळूभाऊ धानोरकर यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी असून त्यांची आठवण सदैव राहील, असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमातील उपस्थिती:
या कार्यक्रमाला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री वसंतरावजी आसुटकर, ज्येष्ठ नेत्या सौ. अरुणाताई खंडाळकर, गौरीशंकर खुराणा, रवीभाऊ धानोरकर, गजाननभाऊ खापणे, तुळशीरामजी पेन्दोर, अंकुश माफुर, बबलु कुरेशी, सतीश कलेवार, काशिनाथ खडसे, यादवराव काळे, अरविंदभाऊ वखनोर, मंगेश उईके, अशोक सुडीत यांच्यासह विविध मान्यवर, काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments