धक्कादायक! व्यायामासाठी गेलेल्या तरुणांना दिसला झाडाला लटकलेला मृतदेह.
नवरगाव (संदीप कोवे)
मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या नवरगाव शिवारात आज सकाळी एका ७२ वर्षीय वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. देवराव यादव मोहर्ले (७२, रा. नवरगाव) असे मृतकाचे नाव आहे.
नेमकी घटना:
नवरगाव शिवारातील कॅनल (कालवा) लगत असलेल्या एका करंजीच्या झाडाला देवराव मोहर्ले यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास आढळून आला. दररोजप्रमाणे काही तरुण सकाळी व्यायामासाठी कॅनल रोडने गेले असता, त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. तरुणांनी तत्काळ गावकऱ्यांना माहिती दिली, त्यानंतर घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती.
पोलीस कारवाई:
या घटनेची माहिती मारेगाव पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. देवराव मोहर्ले यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सध्यातरी या प्रकरणी पोलीस दप्तरी मर्ग दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, मारेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.