मारेगाव हादरले! किरकोळ वादातून हैवानासारखा हल्ला; तरुणाच्या डोक्यात खिळा घुसवला आरपार
मारेगाव ( सचिन मेश्राम):
मारेगाव शहरात कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण करणारी एक अत्यंत क्रूर घटना प्रभाग क्रमांक १७ मध्ये घडली आहे. केवळ शाब्दिक बाचाबाची झाली म्हणून एका १९ वर्षीय तरुणाने संतापाच्या भरात समोरच्या तरुणाच्या डोक्यात खिळे असलेली पाटी इतक्या जोरात मारली की, खिळा कवटी फोडून आरपार घुसला. या रक्तरंजित हल्ल्यात आकाश भेले हा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे.
क्रौर्याची सीमा ओलांडली!
शनिवार, १४ फेब्रुवारीची ती संध्याकाळ आकाशसाठी काळ ठरली. जेवण करून शांतपणे घरी जाणाऱ्या आकाशला वाटेत उभ्या असलेल्या श्लोक दारुन्डेने अडवले. किरकोळ कारणावरून दोघांत हुज्जत झाली आणि क्षणार्धात श्लोकच्या अंगात जणू सैतान संचारला. त्याने बाजूला पडलेली खिळे जडलेली पाटी उचलली आणि थेट आकाशच्या डोक्यावर घातली. तो लोखंडी खिळा डोक्यात घुसताच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि आकाश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
चंद्रपुरात मृत्यूशी झुंज
हल्ला इतका भीषण होता की, खिळा बाहेर काढणेही कठीण झाले होते. अतिरिक्त रक्तस्रावामुळे आकाशची प्रकृती खालावली असून, त्याला तातडीने चंद्रपूर येथील अतिदक्षता विभागात (ICU) भरती करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते त्याची प्रकृती अजूनही अत्यंत चिंताजनक आहे.
गुन्हेगारावर कडक कलमान्वये गुन्हा
या थरारक घटनेनंतर मारेगाव परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित तरुणाचे वडील मनोहर भेले यांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी आरोपी श्लोक गौतम दारुन्डे (१९) याच्यावर धोकादायक शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कलम ११८ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
"क्षुल्लक वादात थेट डोक्यात खिळा घुसवण्यापर्यंत मजल जाणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला पोलीस आता काय धडा शिकवणार?" असा संतप्त सवाल मारेगावची जनता विचारत