नाभिक समाजाच्या 'स्नेहबंध' मेळाव्यासाठी वणी सज्ज; पाच राज्यांतील मान्यवर येणार
शेतकरी मंदिरात रंगणार वधू-वर परिचय सोहळा; आमदार रितेश सैनी यांची लाभणार विशेष उपस्थिती
वणी (आनंद नक्षणे-):
महाराष्ट्र नाभिक महामंडळ, यवतमाळ जिल्हा शाखा वणीच्या वतीने आगामी शनिवारी, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी वणी येथील शेतकरी मंदिरात भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा व समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील युवक-युवतींसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
स्नेहबंध आणि गुणवंतांचा गौरव
या मेळाव्यात विवाहोच्छुक युवक-युवतींचा परिचय करून देण्यात येणार असून, समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा 'समाज गौरव' व 'समाज भूषण' पुरस्कारांनी विशेष सन्मान केला जाणार आहे.
दिग्गजांची मांदियाळी
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित राहतील. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्यासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील समाजबांधव, खासदार, आमदार व मान्यवर नेते या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.
आमदार रितेश सैनी यांची विशेष उपस्थिती
या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणून भिलाई (वैशाली नगर) विधानसभा मतदारसंघाचे आमदार रितेश सैनी यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे.
उपस्थित राहण्याचे आवाहन
नाभिक समाजाच्या या विराट मेळाव्यास सर्व समाजबांधवांनी आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष शशिकांत नक्षिने यांनी केले आहे