अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार:वाहनचालक घटनास्थळावरून पसार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार:वाहनचालक घटनास्थळावरून पसार; राज्य महामार्ग राज्य  अपघाताचे क्षेत्र


मारेगाव : साळ्याला पोहोचवून आपल्या स्वगावी परत जाताना दुचाकीस्वाराला एका अज्ञात वाहनने समोरून जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना मारेगाव तालुक्यातील राज्य महामार्गावरील बोटोनी ते जळका रस्ता लगत असलेल्या डाम टेकडीजवळ आज  30 मे  रोज शुक्रवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.


प्रदीप गुणवत्ता राऊत वय अंदाजे 40 वर्षे रा.आवळगाव ता.मारेगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहेत.प्रदीप हा आज सकाळी 6 वाजता आवळगाव येथून साळ्याला सोडण्यासाठी खंडणी येथे गेला होता.तेथील काम आटोपून तो बोटोनी- करंजी मार्गे स्वगावी आवळगाव येथे जाण्याकरिता निघाला. पण रस्त्यातच अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.



रस्त्याने ये - जा करणाऱ्या काही नागरिकांनी सदर घटनेची माहिती लगेच मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल करण्यात आले. पण मात्र डॉक्टरांनी प्रदीप याला प्राथमिक तपासणी करण्यापूर्वी मृत घोषित केले. प्रदीप यांच्या पश्चात आई,पत्नी, बबिता,मंथन,दुर्गेश असे दोन मुले, भाऊ असा आप्त परिवार पाठीमागे आहे. या अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.