नांदेपेरा रोडवरील खड्ड्यात मनसेने सोडले कमळाचे फुले
🔹 त्वरित होणार कामाला सुरुवात – बांधकाम विभाग
वणी/ : सचिन मेश्राम
शहरातील साई मंदिर चौक ते नांदेपेरा चौफुली पर्यंतचा रस्तावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावर वारंवार लहान सहान अपघात होत आहे. तर नागरिकांना मोठी कसरत करत या रस्त्यातून वाट काढावी लागत असल्याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यात बसून बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले.
शहरातील साई मंदिर चौक ते नांदेपेरा चौफुली रस्त्यावर या रस्त्यावर अनेक दवाखाने, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये, दुकाने आणि गावे असल्याने, विद्यार्थ्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसत आहे. सद्यस्थितीत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले तर नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचून मोठी मोठी डबकी निर्माण झाली. या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजून रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी गेल्या २ महिन्यापासून पत्रव्यवहार केला. मात्र सार्वजनिक विभागाने रस्त्यावरील विजेचे खांब व झाडांच्या अडथळ्यामुले कामाला अडचण येत आहे, त्यामुळे कामाला विलंब होत आहे सांगून बांधकाम विभाग सर्वसामान्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला. परिणाम या मुद्द्याकडे बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मनसेने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या खड्ड्यात बसत खड्ड्यात कृत्रिम कमळाचे फुले सोडून आंदोलने केले. सदर आंदोलन बराच वेळ चालल्याने काही काळ तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करत आंदोलकांना शांततेचे आवाहन केलें सदर आंदोलनांची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रतिनिधी पाठवून आंदोलकांशी चर्चा साधत. दोन दिवसात रस्त्याची डागडुजी करत कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची लेखी माहिती दिली. तर आलेले बांधकाम विभागाचे अधिकारी निष्क्रीय असल्याने त्यांना मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी कमळ फुलांचा गुच्छ देऊन त्यांचे उपासात्मक स्वागत केले.
सदर रस्त्या तात्काळ दुरुस्त न झाल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. मनसे नेहमीच अशा जनसामान्यांच्या प्रश्नांवर आपल्या "मनसे स्टाईल" आंदोलनासाठी ओळखली जाते.
प्रसंगी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, खरेदी विक्री संघाचे संचालक विनोद कुचनकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, मयूर गेडाम, मयूर घाटोळे, गोविंदराव थेरे, संतोष जयस्वाल, मतीन शेख, विलन बोदाडकर, रमेश पेचे, राजू बोदाडकर, धीरज पिदूरकर, राकेश शंकावार, कैलास निखाडे, सोमेश्वर ढवस, प्रवीण मांडवकर, अतुल काकडे, धीरज बगवा, गोवर्धन पिदुरकर, राजू काळे, विजय चोखरे, सुरज काकडे, अनिल पाल, संस्कार तेलतुंबडे, प्रतिक बुरडकर, पद्माकर मालेकर, प्रदीप बदखल, योगेश मते, योगेश माथनकर, गौरव बोबडे, प्रमोद कोल्हे, आकाश चवले, अतुल झाडे, प्रीतम बदखल, प्रमोद कोल्हे, आशिष ठवरी, शिरीष भवरे, सचिन देवतळे, नितीन इंगोले यांच्या सह परिसरातील नागरीक उपस्थित होते.
Box....
मनसेच्या आंदोलनात नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली मागणी रास्त असून या खड्ड्यामुळे सर्वसामान्यांना खूप मोठा त्रास होत असल्याने मनसेच्या आंदोलनाला शहरातील व प्रवास करणाऱ्या नागरिकांना उस्फुर्त प्रतिसाद देत, स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला..
Box....
विहित मुद्दतीत काम चालू न झाल्यास बांधकाम विभागाच्या कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचे निर्वाणीचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिला.