नवरगाव राहत्या घरात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या...

नवरगाव राहत्या घरात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या...

संदिप कोवे- नवरगाव 

मारेगाव- तालुक्यातील नवरगाव येथील ३१ वर्षीय युवकाने स्वत:च्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. 

शुभम तुळशीराम करलूके (वय ३१) असे मृत युवकाचे नाव असून घरात कुणी नसताना त्याने घरातील फाट्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले 


असता या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून आत्महत्येचे कारण सध्या तरी समजू शकले नसून बातमी लिहेपर्यंत मर्ग दाखल होवाचा होता.  शुभम यांच्या पश्चात आई वडील भाऊ, विवाहित बहीण पाठीमागे आहे.