विद्यानिकेतनचा एसएससीचा निकाल शंभर टक्के

विद्यानिकेतनचा एसएससीचा निकाल शंभर टक्के

संदिप कोवे- नवरगाव 

(मनस्वी आत्राम 94.60 तालुक्यातून प्रथम) मारेगाव, नुकताच एसएससी परीक्षा मार्च 2025 चा निकाल लागला असून विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मारेगावने 100% निकालाची परंपरा कायम राखलेली आहे. शाळेतील विद्यार्थिनी कुमारी मनस्वी 94.60% गुण घेऊन तालुक्यातून प्रथम आली तर श्रवण रमेश दोडेवार हा विद्यार्थी 93.60% गुण घेऊन तालुक्यातून द्वितीय आला तर आर्या पवन दानखेडे हिला 91 टक्के गुण प्राप्त झाले शाळेतून सदर परीक्षेला 58 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 32 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 17 विद्यार्थी प्रथम तर उर्वरित द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांनी संपादन

केलेल्या यशाबद्दल संस्था

अध्यक्ष सौ संध्या पोटे सचिव राजेश पोटे मुख्याध्यापिका कुमारी ज्योत्सना बोंडे यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.