सीमा सुरक्षा बल माजी सैनिक कल्याण संघटेने वर्धापन दीन स्नेहमिलन सोहळा केला उत्सहात साजरा

सीमा सुरक्षा बल माजी सैनिक कल्याण संघटेने वर्धापन दीन स्नेहमिलन सोहळा केला उत्सहात साजरा

दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी ईश्वर नगर भोसारोड यवतमाळ येथे प्यारा मिलिट्री माजी सैनिकांनी 59 वा वर्धापन दिन साजरा केला.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ज्ञानेश्वर देवकाते साहेब अवधूत वाडी पो.स्टे. ठाणेदार हे उपस्थित होते. अध्यक्ष आणि मान्यवरांनी दीप प्रज्वल करून स्वतंत्र्य आजाद हिंद सेनेचे गठन केले ते पहिले भारतीय आझाद हिंद सेनाध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र बोस यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तथा भारतीय घटनेचे शिल्पकार व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मेजर जीवन कोवे संघटनेचे कार्याध्यक्ष यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संघटनेचे अध्यक्ष जगत चव्हाण यांनी पूर्वराष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर शहिदांना श्रद्धांजली देऊन सुरुवात झाली.
नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. शहिदांच्या वीरांगना श्रीमती मिना संजय वावरे व श्रीमती दिपाली गजानन मडावी यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यवतमाळ ची स्वरकन्या गीत प्रशांत बागडे सारेगामाप लिटिल चॅम्प्स ह्या छकुलीचा सुध्दा सत्कार करण्यात आला..  नवीनच लाभलेले माजी सैनिक महेश कडू यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले व उत्कृष्ट सेवा पदक निवृत्तीनंतर घरपोच आल्यामुळे मेजर सचिन खंडारे व त्यांच्या परिवारासह सत्कार करण्यात आला. सुरुवातीला प्रमुख पाहुणे राजेंद्र चित्तकुंटलवार आणि गौतम सोनवणे साहेब निवृत्त सुभेदार यांनी मनोगत व्यक्त केले नंतर संघटनेचे अध्यक्ष कमांडर जगत चव्हाण साहेब यांनी सर्व निवृत्त सैनिकांच्या व्यथा व परिवार कल्याना करिता सुख सुविधा व सहकार्याची जाणीव करून सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषण मा. श्री ज्ञानेश्वर देवकाते साहेब ठाणेदार अवधूतवाडी पो. स्टे.यवतमाळ यांनी सहकार्याची भावना व्यक्त करतं सर्वांनी एकतेचा परिचय दिला आणि माजी सैनिकांना शुभेच्छा दील्या..
कार्यक्रमाची प्रस्तावना मुकेश चूढे महाराज यांनी केली तर संचालन मा. विलास गवळी साहेब यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे कार्याध्यक्ष.मेजर जीवन कोवे  यांनी केले.
कार्यक्रमाला उपस्थित माजी सैनिक टीम प्रवीण महले, सुरेश कोरचे, गणपतराव गाडेकर, गजानन ठाकरे, गोपाल माहुरे पवन जगताप, चांदेकर, गणेश धूर्वे, आत्राम साहेब,ओंकार कुंभरे अरुण ठाकरे, मधुकर परचाके रमेश अजबले,गणेश रहाटे, शंकर कन्नाके, गावंडे, सुरेंद्र मेश्राम, मेजर संजय राठोड, आणि सर्व माजी सैनिक सहपरिवार उपस्थित होते......