सराटी येथील अवैध दारू विक्री बंद करा

सराटी येथील अवैध दारू विक्री बंद करा

सचिन मेश्राम -मारेगाव

मारेगाव :  पाेलीस ठाण्यांतर्गत असलेल्या सराटी गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असुन  ग्रामस्थांनी पोलिस उपनिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर सावंत  यांना निवेदन दिले.

सराटी येथे अवैधरीत्या देशी दारूची खुलेआम विक्री केली जात आहे. गावात सुरू असलेल्या दारूविक्रीमुळे लहान मुले तसेच तरुण दारूच्या आहारी जात आहेत, शिवाय गावात भांडण, तंट्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे गावात शांतता भंग हाेत असून, नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकाराबाबत बीट जमादार  यांच्याकडे तोंडी तक्रार केली, मात्र ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आराेपही  नागरिकांनी केला. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून दारूविक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सावंत यांना निवेदन देताना सिद्धार्थ बाहदे, अजित नरांजे, मनोज टोंगे, प्रविण झाडे, शशिकांत सपाट, अमोल मत्ते,यांच्यासह गावकरी उपस्थित हाेते.