महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षकांच १३डिसेंबरला राज्यव्यापी धरणे आंदोलन
(विदर्भ माध्य. शिक्षक संघाचा सक्रिय सहभाग)
राळेगाव : प्रशांत भगत
राज्यातील खाजगी/स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचालित प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व इतर विभागातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाने बुधवार दि. १३ डिसेंबर २०२३ ला नागपूर येथील विधान भवनासमोर धरणे/निदर्शने आंदोलन आयोजित केले आहे. यासंदर्भात महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे व सरचिटणीस व्ही.जी. पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना नोटीस सादर केली आहे.
जिल्हा परिषद, नगर परिषद व नगरपालिका शाळांसाठी निर्गमित केलेल्या "शाळा दत्तक योजना" संदर्भातील दि. १८ सप्टे. २०२३ चा शासन निर्णय रद्द करणे, कंत्राटी पद्धतीने भरती रद्द करणे व शिक्षण विभागातील रिक्त पदे नियमित वेतनश्रेणीवर भरणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी व त्यानंतर नियुक्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा/तुकडीवर नियुक्त शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करणे, राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०,२०,३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करणे, विनाअनुदानित/अंशतः अनुदानित पात्र शाळांना सलग टप्प्या - टप्प्याने अनुदान मंजूर करणे, राज्यातील रिक्त असलेली प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची पदे तात्काळ भरणे, DCPS खाते नसलेल्या शिक्षक - शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाचे थकबाकी हप्ते नगदीने त्वरित अदा करणे, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळेत कार्यरत शिक्षक विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त झाल्यास त्यांच्या समायोजन संदर्भाने नियमावलीत दुरुस्ती करुन त्यांचे समायोजन करणे, जुलै २०२३ पासून केंद्राप्रमाणे ४ टक्के महागाई भत्ता व यापूर्वीचा महागाई भत्ता लागू करणे, निवृत्तीचे वय ६० वर्षं करणे आदि अनेक मागण्यांचा समावेश महामंडळाने पाठविलेल्या नोटीसमध्ये केला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळामध्ये राज्यातील अनेक शिक्षक संघटनांचा समावेश असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ या विदर्भातील बलाढ्य संघटनेचा त्यामध्ये सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दि. १३ डिसेंबरला यशवंत स्टेडियम नागपूर येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत आयोजित धरणे/निदर्शने आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह आमदार सुधाकर अडबाले, प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे, प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद देशमुख, विभागीय कार्यवाह मुरलीधर धनरे तसेच विदर्भातील सर्व प्रांतीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष अशफाक खान सर जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर, कार्याध्यक्ष मनोज जिरापूरे , कार्याध्यक्ष विजय खरोडे, उपाध्यक्ष पवन बन, उपाध्यक्ष गणेश धर्मांळे, उपाध्यक्ष साहेबराव धात्रक, उपाध्यक्ष मंगला वडतकर, उपाध्यक्ष एस आर डोंगरे, उपाध्यक्ष एस एम वडते , उपाध्यक्ष संजय पुरी, सहकार्यवाह आनंद मेश्राम, सहकार्यवाह संजय देवाळकर, सहकार्यवाह गंगाधर गेडाम, सहकार्यवाह कविता कोरचे, सहकार्यवाह श्रीकांत अंदूरकर, सहकार्यवाह महेश अंदूरे, सहकार्यवाह संतोष हेडाऊ, कोषाध्यक्ष अरूण गारगाटे, जिल्हा संघटक सुरेश बरडे, जिल्हा संघटक दिवाकर नरूले, जिल्हा संघटक प्रभू गुंडेवाड, जिल्हा संघटक गजानन इंगोले, जिल्हा संघटक छाया कोरडे, जिल्हा संघटक सुरेंद्र शिंदे, प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र काकडे, महिला प्रतिनिधी रेखा सुरकर,शेख जुलेखाॅ शेख रशीद, निमंत्रित सदस्य प्रमोद दुधे,एम व्ही जाधव,एस एम मरापे, गौतम वासणिक यांनी केल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे श्रावनसिंग वडते सर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा यांनी दिली.