गारगोटी (पोड)येथे आदिवासी कला व संस्कृती महोत्सव
मारेगाव:तालुक्यातील गारगोटी( पोड) येथे भारतीय संविधान दिन व क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी कोलाम समाज सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन उद्या दि.३० नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे असून. या कार्यक्रमाचे उद्घाटक विधानसभा मतदारसंघाचे आ. संजीव रेड्डी बोदकुलवार, तर अध्यक्षपदी भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विशेष प्रमुख अतिथी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पावडे , माजी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष शंकर लालसरे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, सह आदी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून माजी आयुक्त उत्तम मानकर, माजी गटविकास अधिकारी मधुकर घसाडकर, कोलाम संघटना जिल्हाध्यक्ष राहुल आत्राम राहणार आहे.
सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी कोलाम संघटना अध्यक्ष सूर्यभान ढोबरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अविनाश लांबट, भाजपा उपाध्यक्ष जयवंत ठेपाले, गणेश झाडे, शहराध्यक्ष अनुप महाकुलकर,सुषमा ठेपाले, सुनीता पांढरे, प्रवीण बोथले, आशिष खंडाळकर, श्रीकांत गौरकार, दिलीप आत्राम, प्रदीप दाहुले सह आदींनी केले आहे