प्रेरणा ग्राम विकास संस्था द्वारा एक दिवसीय महीला मेळाव्याचे आयोजन

प्रेरणा ग्राम विकास संस्था द्वारा एक दिवसीय महीला मेळाव्याचे आयोजन 


राळेगाव -प्रशांत भगत 

आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील महीला, अपंग, विधवा, एकल व शेतकरी - कष्टकरी महिलांनी एकत्र येऊन विचार मंथन करण्या करीता व प्रश्न समजून घेऊन सोडविण्या करीता एक दिवशीय   
मेळाव्याचे आयोजन दि 24 नोव्हेंबर 23ला ग्रामीण विकास प्रकल्प इथे प्रेरणा ग्राम विकास संस्था द्वारा करण्यात आले होते.
कार्य क्रमाचे प्रमुख पाहुणे मिनल जगताप केंद्र प्रमुख, सखी वन्स स्टाफ सेंटर ( संकट ग्रस्त महीला निवारा केंद्र) यांनी केंद्राचा उद्देश व त्यात महिलांना मिळणाऱ्या सुविधा यावर मार्गदर्शन केले, राळेगाव पो स्टेशन चे ठाणेदार  रामकृष्ण जाधव यांनी गाव पातळीवरील दारूबंदी समिती व तिचे कार्य यावर महिती दिली, देवेंद्र राजूरकर जिल्हा संरक्षण अधिकारी महीला व बाल विकास विभाग यानी बाल संगोपन योजनाचा लाभ कोण घेऊ शकतो त्याच प्रमाणे अनाथ मुलांचे प्रमाण पत्र व अन्याय्य - अत्याचार ग्रस्त मुलींना सोई सुविधा पुरविण्या बाबत माहिती दिली, कृषी मंडळाधिकारी विजय धांदे यानी महीला करीता कृषी विषयक योजनांची माहिती दिली, एकल महिलांच्या प्रतिनिधी निर्मलाताई रेंघे यांनी एकल महिलांच्या कौटुंबिक व सामाजिक समस्या बाबत मांडणी केली, गाव पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या प्रातिनिधिक महिलांना संस्थेच्या वतीने व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला, तर प्रमुख पाहुण्या ना सेंद्रीय शेतीतील पिकविलेले धान्य व फुलांचे रोपटे देवून स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष अंजनाताई मडावी माजी  सरपंच धोत्रा या होत्या,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या समन्वयक राजश्री चंदनकर यांनी तर माधुरी खडसे यांनी संस्थेच्या उपक्रमा बाबत माहिती दिली, जोत्सना उईके कार्यकर्ती यांनी संचलन केले, आशाताई कर्रेवार कार्यकर्ती यांनी आभार प्रदर्शन केले, कार्यक्षेत्रातील 130 महिला मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.