क्रांतिवीर शामादादा कोलाम,संविधान दिन व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनपर व भव्य मिरवणूक

क्रांतिवीर शामादादा कोलाम,संविधान दिन व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनपर व भव्य मिरवणूक


सचिन मेश्राम -मारेगाव

मारेगाव शहरातील  नगरपंचायत पटांगण येथे आदिवासी शामादादा कोलाम  संघटना यांच्या  विद्यामाने संविधान दिन, रॉबिन हूड शामदादा कोलाम व बिरसा मुंडा जयंती निमित्य प्रबोधनपार व भव्य मिरवणूक आयोजन आज दि.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११वाजताच्या सुमारास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल आत्राम, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद तथा क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटनेचे नेते लेतूजी जुनगरे प्रमुख पाहुणे क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटनेचे सचिव गणेश आत्राम, डॉ. महादेव मुरझडी, शिक्षकरत्न पुरस्कार तथा  क्रांतिवीर शामादादा संघटनेचे नेते पैकाजी आत्राम सर,क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटनेचे नेते सुरेश मुंडाले, हरिभाऊ रामपुरे, गंगाधर आत्राम, तुळशीराम कुमरे , उत्तमराव मानकर, गिरीधर मांगुळकर , अर्जुन आत्राम, प्रशांत टेकाम, दादाराव ढोबरे,पोतू आत्राम, दादाराव आत्राम हुसेन ढोबरे,विजय  भाऊ ढोबरे यांची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन शामादादा कोलाम संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.