किन्ही वन जि. प. शाळेत शाळापूर्व तयारी उपक्रमात दाखल पात्र विद्यार्थ्यांचे पारवा ठाणेदाराकडून स्वागत..
दाखल पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करून दिले प्रोत्साहन*
प्रतिनिधी। राजु चव्हाण
घाटंजी-मागील दोन वर्षांपासून कोविड-१९ च्या प्रकोपात शाळा बंद होत्या. यात विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाला. पूर्व प्राथमिक शिक्षण देणारे अंगणवाडी केंद्रदेखील बंद होती. त्यामुळे यावर्षी शाळेत दाखल होणारे बालके व इयत्ता पहलीत दाखल असलेले बालके यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण काहीही झाले नाही त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू होण्यापूर्वी शिक्षणाची पूर्व तयारी म्हणून घाटंजी तालुक्यातील किन्ही (वन) आयोजित शाळापूर्व तयारी कार्यक्रमात पहिल्या वर्गात दाखल पात्र विद्यार्थ्यांचे पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
मागील दोन वर्षांपासून कोरोना या महामारीच्या संकटात आपण सर्व होतो. या रोगाचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झाला आहे. काही मुले येत्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये इयत्ता पहिली मध्ये दाखल होतील, परंतू त्यांना प्रत्यक्षात अंगणवाडी किंवा बालवाडीचा अनुभव मिळालेला नाही. या मुलांची पूर्व शालेय तयारी करण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र शासनाच्या स्टार्स प्रकल्पाअंतर्गत शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाची अमलबजावणी थाटामाटात करण्यात येत आहे. यात गावातून ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात येवून दाखल पात्र विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना वाजत गाजत शाळेच्या प्रांगणात आणण्यात येत आहे. त्याच प्रमाणे किन्ही (वन) जिल्हा परिषद शाळेत दाखल पात्र लाभार्थी व पालक उपस्थित असताना. हा उपक्रम सफल व्हावात,विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण होवून शाळेप्रती ओढ निर्माण होवून त्याने शिक्षण घ्यावेत, त्याचे माघारलेले शिक्षण पूर्ण व्हावेत या प्रोत्साहनासाठी पारवा ठाणेदार विनोद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.