दुचाकीवरून पडून तिन वर्षीय बालिका ठार ; चिंचमंडळ येथील घटना
प्रतिनिधी। कैलास मेश्राम
मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथे आईवडिलांच्या सोबत दुचाकीवर जाणाऱ्या तीन वर्षीय बालिकेचा चारचाकी वाहनाचा धक्का बसल्याने दुचाकीवरून तिन वर्षीय बालीकेचा पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
पांढरकवडा तालुक्यातील रुंझा येथील रहिवासी गुंजन शाम पारशिवें ही बालिका आपल्या आईवडिलांच्या सोबत दुचाकीवर बसून रुंझा येथून चिंचमंडळ येथे येत असताना दि. 14 एप्रिल रोज गुरूवारच्या रात्री नऊ वाजताचे दरम्यान चारचाकी वाहनाचा धक्का बसल्याने समोरील प्रकाश डोळ्यावर पडल्याने समोर काहीच दिसले नसल्याने . यात दुचाकीचालकांचे वाहना वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीवर बसलेली तिन वर्षीय बालिका गुंजन ही दुचाकीवरून खाली पडून ती गंभीर जखमी झाली जखमी अवस्थेत तिला वणी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी बालिकेवर उपचार करण्यापुर्वी मृत्यू घोषित केले.