समतेची शाळा" उपक्रमाची सुरवात
माऊली बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार!
घाटंजी
प्रतिनिधी। राजु चव्हाण
घाटंजी- डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत तर पक्षपात आणि जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारकही होते. भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात माऊली बहुउद्देशीय संस्था च्या वतीने मुच्छि येथे साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक संगीता हेलुंडे, आकाश बुर्रेवार,तुकाराम आत्राम,आनंदराव टेकाम लाभले होते. त्यांनी महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सूरवात केली. तसेच आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी साविधांची प्रास्ताविक भेट देत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
जयंतीचे अवचीत्य साधून मान्यवरांच्या हस्ते माऊली बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून "सावित्रीबाई फुले युवती मंच" आणि "समतेची शाळा" या दोन उपक्रमाची सुरवात करण्यात आली. सदर उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये युवतींनचे एक व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे. यामुळे युवती एकत्रित येतील आणि त्यांच्या संदर्भातील विषयांवर चर्चा करतील. आणि आपले प्रश्न प्रशासनासमोर मांडतील. या मंच च्या माध्यमातून बालविवाह आणि कुमारीमाता, आणि इतर प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्न केला जाणार आहे सोबतच त्यांच्यासाठी विवध प्रशिक्षणे ही घेण्यात येणार आहेत .
तसेच समतेची शाळा या उपक्रमातून गावातील प्रत्येक नागरिकांनापर्यंत खास करून गावातील बालकांना संविधानाची प्राथमिक माहिती देण्यात येणार आहे. यासोबतच एकल महीला, बालकांच्या आणि वृद्धांसाठी असलेल्या शासकीय योजनांची जनजागृती या उपक्रमांच्या माध्यमातून केली जाणार आहे.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबाराव आत्राम,अंगणवाडी सेविका कविता मडावी,पुंजाराम आत्राम,विजय टेकाम, वर्षा डेबुरकर, पायल मेश्राम, खुशी टेकाम, नागीबाई आत्राम, पो. पाटील गोपाल आत्राम संजय डेबुरकर, शांताबाई डेबुरकर, लीलाबाई मडावी यांनी विषेश प्रयत्न केले होते.