पांढरकवड्यात महामानवाला अभिवादन!

पांढरकवड्यात  महामानवाला अभिवादन! 

    पांढरकवडा
प्रतिनिधी। वाजीद कुरेशी



कोरोनाच्या निर्बंधांमुळे 2 वर्षे डॉ. आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी करता आली नाही. पण यंदा निर्बंध हटविण्यात आल्याने पांढरकवडा शहरात महामानवाला जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.



  भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे दोन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी करता आली नाही. पण यावर्षी राज्य सरकारकडून निर्बंध हटविण्यात आल्याने राज्यात मध्यरात्रीपासूनच ठिकठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यात येत आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  महामानवाला अभिवादन करण्यात आले यावेळी असंख्य बाबासाहेबचे अनुयायी मोठ्या यावेळी उपस्थित होते.