कृषी महाविद्यालयातर्फे ई पीक पाहणी कार्यक्रम घेण्यात आला

कृषी महाविद्यालयातर्फे ई पीक पाहणी कार्यक्रम घेण्यात आला


आर्वी/ प्रतिनिधी 



आर्वी -: तालुक्यातील पिंपरी (पारगोठान ) येथे श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा ता. धामणगाव जि. अमरावती येथील शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी कार्यक्रम घेण्यात आला.
  यावेळी कृषि विद्यार्थिनी कु. प्रज्ञा युवराज दाहाट हिने ई-पीक पाहणी ॲप हाताळण्या संदर्भात मार्गदर्शन केले.
   "माझी शेती माझा सातबारा माझा पिक पेरा" या घोषवाक्य च्या आधारे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी करण्याची सुरुवात 15 ऑगस्ट ला झाली असून तर काही ठिकाणी ई-पीक पाहणी आपला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी अजूनही म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर आले आहे.
     महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाकडून शेतकरी स्तरावरील पीक पाहणी ची नोंदणी करावी यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. तसेच तलाटी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता हा कार्यक्रम आयोजित केला गेला. त्यावेळी तलाठी सतीश देशमुख  सर तसेच गावातील शेतकरी यांनी बहुतांश असा प्रतिसाद दिला.