मारेगाव तालुक्यात सार्वजनिक विहिरींची दुरवस्था; सांडपाणी अन् कचऱ्यामुळे विहिरी प्रदूषित.

  • मारेगाव तालुक्यात सार्वजनिक विहिरींची दुरवस्था; सांडपाणी अन् कचऱ्यामुळे विहिरी प्रदूषित.

          मारेगाव तालुक्यातील सार्वजनिक विहिरींची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. अनेक गावांमध्ये या सार्वजनिक विहिरींचा वापर वैयक्तिक सांडपाण्यासाठी केल्या जात आह. तर काही ठिकाणी कचराकुंडी म्हणून या विहिरींचा वापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव मारेगाव तालुक्यात दिसून येत आहे.
       महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाने दडी मारलेली आहे. आधीच पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुष्काळ असतांना आणि अशातच पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. पिण्याच्या पाण्याचे भीषण वास्तव समोर असतांना अशा विहिरींचे अधिग्रहण करून या  सार्वजनिक वीहिरी पिण्याच्या पाण्यासाठी वापरात यायला हव्या होत्या. परंतु अनेक विहिरींवर खाजगी लोकांनी अतिक्रमण करून कोणी सांडपाणी तर कोणी कचराकुंडी करीता या विहिरी बुजवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अशा सार्वजनिक असलेल्या विहिरी ग्रामपंचायतला हस्तांतरण करून त्या मोकळ्या करण्यात याव्या अशी मागणी जनतेतून होत आहे.( भाग क्रमश:)

Post a Comment

0 Comments