चोपन येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये चालतो जुगार जुगारात हरल्यावर जुगारी करतात शाळेतील वस्तूंचे नुकसान
सचिन मेश्राम - मारेगाव
मारेगाव तालुक्यातील चोपन येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये रात्रीच्या वेळेस जुगारी जुगार खेळतात. जुगारात हरल्यानंतर ते शाळेमध्ये असलेल्या वस्तूंचे नुकसान करीत असल्यामुळे शाळेतील शिक्षक तथा विद्यार्थी आणि पालक त्रस्त झालेले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
चोपन येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. तिथे पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहे. शाळेला सभोताल कंपाऊंड आहे. परंतु कंपाउंड असून सुद्धा गावातील काही जुगारी शाळेच्या कंपाउंडवरून शाळेमध्ये जातात आणि रात्री जुगार खेळतात. जुगारात हरल्यानंतर काही जुगारी शाळेतील पाण्याच्या नळाचे आणि पाण्याच्या टाकीचे सुद्धा नुकसान करीत असतात. असे वारंवार घडत असल्यामुळे शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थी तसेच पालक सुद्धा त्रस्त झालेले आहे. यामध्ये शाळेतील पिण्याच्या पाण्याची टाकी फोडलेली आहे. तसेच नळ तोडून त्यांचे तुकडे तुकडे केलेले आहे. सततच्या या नुकसानीमुळे किती वेळा नळाची दुरुस्ती करायची असा प्रश्न शिक्षिकेने उपस्थित केला. त्यामुळे या समस्येकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
0 Comments