मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील अपघातातील जखमी तरुणाचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू; उपचारातील दिरंगाईचा कुटुंबीयांचा आरोप

मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील अपघातातील जखमी तरुणाचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू; उपचारातील दिरंगाईचा कुटुंबीयांचा आरोप

​मारेगाव : सुनिल उताणे 

मारेगाव तालुक्यातील बुराडा फाट्याजवळ १५ मे रोज  शुक्रवार  रोजी रात्री  आठ वाजता सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेला तरुण साईल संतोष झोंटिंग (वय १८, रा. बोटोणी) याचा नागपूर येथील व्हिम्स (VIMS) रुग्णालयात उपचारादरम्यान १९ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता मृत्यू झाला. उपचारासाठी पुन्हा बोलावले असताना डॉक्टर वेळेवर हजर नसल्याचा गंभीर आरोप मृताच्या वडिलांनी केला आहे.

​काय आहे घटना?
​मिळालेल्या माहितीनुसार, १५ मे रोजी बुराडा फाट्या जवळ दोन दुचाकी वाहनांमध्ये समोरासमोर अपघात झाला होता. या अपघातात बोटोणी येथील साईल संतोष झोंटिंग हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी नागपूर येथील व्हिम्स (VIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते.

​दरम्यान, पुढील उपचारासाठी आणि तपासणीसाठी त्याला १९ जुलै रोजी पुन्हा नागपूरच्या संबंधित रुग्णालयात बोलावण्यात आले होते. त्यानुसार कुटुंबीय त्याला घेऊन रुग्णालयात पोहोचले. परंतु, ठरलेल्या वेळी संबंधित डॉक्टर रुग्णालयात हजर नव्हते, असा आरोप मृताच्या वडिलांनी केला आहे. योग्य वेळी व योग्य उपचार न मिळाल्यामुळेच साईलची प्रकृती बिघडल्याचे सांगत, १९ जुलैच्या रात्री ९:३० मिनिटांनी डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.



​तरुण मुलाच्या अकाली मृत्यूने हळहळ
​अवघ्या १८ वर्षांच्या साईल झोंटिंगचा उपचारादरम्यान उपचारातील दिरंगाईमुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्याने परिसरात शोककळा पसरली असून संताप व्यक्त होत आहे. तरुण मुलाच्या निधनाने बोटोणी गावावर आणि झोंटिंग कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Post a Comment

0 Comments