उमरी शिवारात वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू; एक गंभीर जखमी
जावेद शेख,कळंब
उमरी (ता. कळंब, दि. २३ जून): कळंब तालुक्यातील उमरी शेतशिवारात मंगळवारी (२३ जून) दुपारी सुमारे ३.५० वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव रामभाऊ लाटकर (वय ५५), साहिल भीमराव लाटकर (वय २२) आणि निखिल वाल्मिक भोयर (वय ४०) हे तिघेही शेतात काम करत असताना अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली.
या दुर्घटनेत भीमराव रामभाऊ लाटकर आणि निखिल वाल्मिक भोयर यांचा जागीच मृत्यू झाला. तर साहिल भीमराव लाटकर गंभीर जखमी झाला असून त्याला प्रथम राळेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथे हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात वीजांचा कडकडाट सुरू असताना शेतकरी व शेतमजुरांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
0 Comments