अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात मारेगावमध्ये २६ जूनला धरणे आंदोलन
सचिन मेश्राम, मारेगाव
मारेगाव:अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या(Sub-categorization) निर्णयाविरोधात आंबेडकरी समाजात तीव्र असंतोष पसरला असून, या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मारेगाव येथे येत्या २६ जून २०२६ रोजी 'लक्षवेधी धरणे आंदोलन' आयोजित करण्यात आले आहे.
संविधानात्मक हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि उपवर्गीकरणाच्या हालचालींना लगाम घालण्यासाठी मारेगाव शहर व तालुक्यातील समस्त आंबेडकरी समाज बांधवांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन २६ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पार पडणार आहे.
प्रमुख आंदोलक:
या आंदोलनाचे नेतृत्व विलास रायपुरे, गजानन चंदनखेडे, चंदू बहादे, ज्ञानेश्वर धोपटे, गौतम दारुंडे, सुधाकर भगत, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत नरांजे, संजय दारुंडे, विनय डोहने, सुदेश तेलंग यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते करणार आहेत.
याशिवाय कुंभा येथील गुलाबराव नगराळे, आकापूरचे संजय वानखेडे, टाकळखेड्याचे संजय जीवने, नरसाळ्याचे अजय रायपुरे, नवरगावचे सुरेश घायवन, संगणापूरचे संतोष वानखेडे, मार्डीचे नंदू कांबळे, देवाळा येथील अशोक पुसाटे, कोलगावचे प्रशांत पारखी, कान्हळगावचे प्रदीप वनकर, बोटोनीचे प्रवीण वनकर, सराटीचे अजित नरांजे, वनोजादेवीचे हरिदास नगराळे, बमाडीचे गौतम तोतडे, केगाव-बोदाद येथील ठमके आणि वेगाव येथील खैरे हे देखील आंदोलनात सहभागी होणार आहेत.
आरक्षणाशी संबंधित या संवेदनशील विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि आपल्या मागण्या मांडण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
0 Comments