ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन
– अर्पित वाहाणे, प्रतिनिधी, वर्धा
📞 8956647004
आर्वी, : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन येत्या २० जून रोजी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील आदिती लॉन्स, लाडगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे आयोजन युनियनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश दाभाडकर यांनी केले आहे.
या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde, Sunetra Pawar, ग्रामविकास मंत्री Jaykumar Gore तसेच आमदार व महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष Bacchu Kadu उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
याशिवाय युनियनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश दाभाडकर व राज्य कार्याध्यक्ष काझी अल्लादिन यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अधिवेशनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून भविष्यातील संघटनात्मक दिशा निश्चित केली जाणार आहे.
या महत्त्वपूर्ण अधिवेशनाला आर्वी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे आर्वी तालुकाध्यक्ष योगेश हरणखेडे यांनी केले आहे.
– अर्पित वाहाणे, प्रतिनिधी, वर्धा
📞 8956647004
0 Comments