मारेगावमध्ये सौंदर्याचा धमाका! आत्मनिर्भर संस्थेचा 'मोफत मास्टरक्लास'; महिलांना मिळणार रोजगाराची सुवर्णसंधी!

मारेगावमध्ये सौंदर्याचा धमाका! आत्मनिर्भर संस्थेचा 'मोफत मास्टरक्लास'; महिलांना मिळणार रोजगाराची सुवर्णसंधी!


मारेगाव (प्रतिनिधी): सचिन मेश्राम 

मारेगाव तालुक्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी 'आत्मनिर्भर सामाजिक विकास संस्था' सरसावली आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजता शहरात एका भव्य आणि मोफत 'ब्युटी मास्टरक्लास' चे आयोजन करण्यात आले असून, यामुळे स्थानिक महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

तज्ज्ञ मार्गदर्शन आणि 'रील स्टार'ची उपस्थिती

​या मास्टरक्लासमध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा नमिता पाटील या महिलांना सौंदर्य क्षेत्रातील आधुनिक तंत्रांचे धडे देतील. तसेच, या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे सोशल मीडियावरील प्रसिद्ध 'गावाकडची बाई' फेम रील स्टार ज्योत्स्ना प्रफुल बदखल (रा. करणवाडी) यांची विशेष उपस्थिती असणार आहे.



काय शिकायला मिळणार?

​या कार्यशाळेत महिलांना प्रत्यक्ष 'हँड टू हँड' सराव करण्याची संधी मिळेल. यात प्रामुख्याने:

  • पिगमेंटेशन आणि डँड्रफ ट्रिटमेंट
  • इन्स्टंट ग्लो क्लीनअप, डिटॅन आणि पोटली फेशिअल
  • आयुर्वेदिक हेअर रिग्रोथ आणि कॅराटिन स्पा ट्रिटमेंट
  • डबल क्लिंजिंग आणि प्रोफेशनल ब्युटी टिप्स

आयोजकांचा जबरदस्त फौजफाटा

​हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारेगावमधील वैशाली सूर (प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट), रुपाली दोरखंडे, अनुताई जेनेकर आणि मनिषा पावडे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. या सर्वांच्या नियोजनामुळे हा उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

कार्यक्रमाचा तपशील:

  • वेळ: सकाळी ११:०० वाजता, २० फेब्रुवारी
  • स्थळ: भिवाजी नगर, वॉर्ड नं. १७, मारेगाव
  • संपर्क: ८६९८८१२७५५