मारेगावात इंजिनिअरिंग विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

मारेगावात इंजिनिअरिंग विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

 पितृविरहाच्या धक्क्यातून उचलले टोकाचे पाऊल

मारेगाव : सचिन मेश्राम 

येथील २२ वर्षीय तरुण संकेत शशिकांत कोरले याने पितृत्वविरहाच्या विवंचनेतून आज रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे संपूर्ण मारेगाव शहरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

संकेत हा शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते, तेव्हापासून तो मानसिकदृष्ट्या खचलेला होता. तो यवतमाळ येथे अभियांत्रिकीचे (Engineering) शिक्षण घेत होता, मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो मारेगाव येथेच वास्तव्यास होता.
​कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर:
संकेतच्या पश्चात त्याची आई आणि एक धाकटी बहीण असा परिवार आहे. आई शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते, तर त्याची बहीण उमरी येथे नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. आज दुपारी घरी कोणीही नसताना संकेतने हे टोकाचे पाऊल उचलले.
​तपास सुरू:
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार वडिलांच्या निधनानंतर तो सतत तणावात असायचा असे समजते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.