मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांच्या संचालक पदी प्रफुल नान्ने,प्रफुल शिवरकर
जिल्हा यवतमाळ या संस्थेचे सभासद करून घेण्याचे आदेश काढले
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध यवतमाळ तर्फे अपिलार्थी यांना भुजलाशयिन पाचपहूर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित पाचपहूर तालुका झरी जामणी जिल्हा यवतमाळ या संस्थेचे सभासद करून घेण्याचे आदेश दिले.भोई समाजातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारी असून मासेमारी करण्याकरिता या संस्थेत सभासद असणे आवश्यक गरजेचे आहे. जातीने भोई असलेल्या लोकांना मासेमारी करून उदर निर्वाह करण्याकरिता भुजलाशयिन पाचपहूर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित पाचपहूर तालुका झरी जामणी जिल्हा यवतमाळ कडे अर्ज केला होता परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीची कारणे दाखवून लोकांना रोजगारा पासून वंचित ठेवले होते.जास्त सभासद संख्या झाल्यास लोकांच्या उत्पन्ना वर विपरीत परिणाम होईल नफा मिळणार नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले होते. या संस्थेच्या सभासदत्वासाठी श्री प्रफुल वासूदेव नान्ने,श्री.प्रफुल अशोक शिवरकर दोघेही रा. बोरगांव (कडू) ता. केळापुर जि. यवतमाळ अपीलार्थी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्याखालील नियम १९६१ अंतर्गत भूजलाशयीन पाचपहूर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. पाचपहूर र.नं. १६२४ ता.झरी जामणी जि. यवतमाळ या संस्थेचे सभासद करुन घेण्याकरीता या कार्यालयाकडे अपील दाखल केलेले होते. दिनांक १५/०१/२०२५ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. तसेच भूजलाशयीन पाचपहूर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. पाचपहूर र.नं. १६२४ ता.झरी जामणी जि. यवतमाळ या संस्थेमध्ये ३८ व भूजलाशयीन महिला मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. कटली बोरगांव र.नं. १६२५ ता.झरी जामणी जि. यवतमाळ या संस्थेमध्ये ३० सभासद असून दोन्ही संस्थेमिळून एकूण ६८ सभासद आहेत. त्यामुळे संस्थेचे सभासद संख्या वाढवणे अनिवार्य असल्याने तसेच अपिलार्थी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहीवासी असल्यामुळे त्यांना सभासद करण्यात यावे अशी विनंती केली आहे. तसेच सरपंच,ग्रामपंचायत बोरगांव यांचे बोरगांव या गांवाचे रहिवासी प्रमाणपत्र जोडले आहे. तसेच दोन्ही अपिलार्थी यांनी त्यांचे आधार कार्ड अपिला सोबत जोडून ते जातीने भोई असल्याबाबत चे मा. उपविभागीय अधिकारी केळापूर यांचे जातीचे प्रमाणपत्र सोबत जोडले आहे.अपितार्थी यांना संस्थेकडे रितसर अर्ज देवून व संस्थेच्या उपविधी नुसार सभासद भाग व प्रवेश फी भरुण संस्थेचे नाममात्र सभासद होता येईल व अध्याक्षाकडून रितसर परवाना घेवून मासेमारी पकडण्याचा व मासे विक्रीचा परवाना घेवून मासेमारी करण्यास परवानगी देण्यात येईल असे नमूद आहे.
अपीलार्थी यांनी प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेले रेकॉर्ड, कागदपत्रे तसेच मा.सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), यवतमाळ यांनी अपिलार्थी यांची तांत्रिक क्रियाशिलतेची तपासणी करुन अहवाल सादर केला आहे. सदर अहवालामध्ये श्री. प्रफुल वासुदेव नान्ने व श्री. प्रफुल अशोक शिवरकर रा. बोरगांव (कडू) ता. केळापूर जि. यवतमाळ यांची तांत्रिक क्रियाशितला तपासणी दिनांक- १५/०२/२०२५ रोजी पाचपहूर तलाव (१०६ हे) येथे कार्यालयाचे अधिका-यामार्फत घेण्यात आली असुन तपासणी दरम्यान दोन्ही अपिलार्थी यांनी कार्यालयाचे अधिकारी यांचे समक्ष सदर तलावात यशस्वीरीत्या पोहून व जाळे मारुन दाखविले त्यामुळे दोन्ही अपिलार्थी क्रियाशिल मासेमार असल्याचे आढळून आले. ही सर्व बाब लक्षात घेता अपीलार्थीना सभासदत्व देण्याचा आदेश सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध यवतमाळ द्वारे पारित करण्यात आला आहे तरी.