राळेगाव शहरात होणार (RPL) राळेगाव प्रीमियम लीग क्रिकेटचे भव्य सामने

राळेगाव शहरात होणार (RPL) राळेगाव प्रीमियम लीग क्रिकेटचे भव्य सामने


राळेगाव: प्रशांत भगत 

( IPL) म्हणजे इंडियन प्रीमियम लीग सगळ्यांनी ऐकलेले आहे त्याप्रमाणे( RPL) म्हणजे राळेगाव प्रीमियम लीग हे राळेगाव शहरात क्रिकेटचे भव्य सामने व लाखो रुपयांचे बक्षिसे दिनांक 27 नोव्हेंबर 2023 ते रविवार 3 डिसेंबर 2023 ला होणार आहे. याचे सर्व श्रेय राळेगाव शहरातील सुपरीचित आदर्श युवक विकास मंडळ यांना जाते. आदर्श युवक विकास मंडळ राळेगाव मध्ये सर्व क्षेत्रातील लोकांचा गुणगौरव करतात जसे कला, सांस्कृतिक, क्रीडा असो की मग समाजकार्य ह्या प्रत्येक क्षेत्रात हे मंडळ आघाडीवर आहे कित्येक वर्षापासून क्रिकेट या खेळाशी या मंडळाची नाळ जोडली आहे त्यामुळे हे मंडळ दरवर्षी क्रिकेट सामने विदर्भ स्तरावर खेळवत होते परंतु यावर्षी या सामन्याचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण बाहेर यावे म्हणून खास फक्त राळेगाव विधानसभा क्षेत्रातील क्रिकेट संघांना याचा फायदा होणार आहे हे सामने राळेगाव विधानसभा क्षेत्रापुरते मर्यादित आहे त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपला खेळ याद्वारे दाखवायची संधी आदर्श युवक मंडळांनी उपलब्ध करून दिली आहे या RPL मध्ये खेळणारे संघ राळेगाव, कळंब, डोंगर खड्डा, वडकी, जोडमोहा ,बोरीमहल, यावली व सावर हे संघ खेळतील या सामन्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे सामने लाईव्ह युट्युब वर सर्वांना पाहता येतील या सामन्यात प्रथम बक्षीस 50000, दुसरे बक्षीस 25000 हजार, तिसरे बक्षीस 15000 हजार, व चौथे बक्षीस 10000 हजार आहे याव्यतिरिक्त वैयक्तिक बक्षिसांची लूट यवतमाळ रोडवरील आयटीआय जवळील ग्राउंडवर होणार आहे करिता सर्व क्रिकेट प्रेमी लोकांनी या सामन्याचा आनंद घ्यावा असे आदर्श युवक विकास मंडळाचे सचिव फिरोज लाखांनी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
       यावेळी पत्रकार परिषदेला प्रामुख्याने उपस्थित असलेले राज्याचे माजी शालेय शिक्षण तथा क्रीडा मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी सांगितले की, ग्रामीण भागात सुद्धा दर्जेदार खेळाडू आहे, म्हणून अश्या स्पर्धचे आयोजन होणे खेळाडूंसाठी आवश्यक आहे.
      यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अशोक भागवत, धनंजय सेगेकर, प्रदीप ठुणे, युसुफअली सैय्यद, अमोल पंडित, सागर जुमनाके, दिलीप दुधगिरकर, अंकित बोटरे, महेश परचाके, नगराध्यक्ष रवींद्र शेराम, उपाध्यक्ष जानराव गिरी तथा पत्रकार बांधव उपस्थित होते.